कोरोनामहाराष्ट्र

राज्यात आतापर्यंत 50 हजार गुन्हे !

CRIME

Pune City News:- राज्यात सर्वत्र सुरु असलेल्या टाळेबंदी (लॉकडाऊन)च्या काळात 22 मार्च ते 17 एप्रिल या कालावधीत राज्यात कलम 188 नुसार 49,756 गुन्हे दाखल झाले आहेत,तर 10,276 व्यक्तींना अटक करण्यात आली असून 32,424 वाहने जप्त केल्याची माहिती पोलीस विभागाने प्रसिद्धीपत्रकामार्फत दिली आहे.

उपरोक्त कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या 100 नंबर वर 70, 307 फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे, अशा 555 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले.

या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1044 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. परदेशी नागरिकांकडून व्हिसा उलंघनचे 15 गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी 1,82,76,744 (1 कोटी 82 लाख 76 हजार 744) रुपयांचा दंड आकारला आहे.

Related posts

कोरोना : स्वयंशिस्त पाळा अन्यथा लष्कराची मदत घ्यावी लागेल

Vishal Khandagale

पुणे महापालिका खरेदी करणार 25 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन; स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने

Vishal Khandagale

शहरांत उद्यापासून मिनी लॉकडाऊन, जाणून घ्या निर्बंध

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX