Pune City News:- दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मर्कझमधील धार्मिक कार्यक्रम सहभागी झालेल्या पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झालेल्या 23 पैकी 2 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात कोरोना बाधितांचा आकडा आता वाढला आहे. या पॉझिटिव्ह रुग्णांमुळे पिंपरी चिंचवड शहरात आणखी काही रुग्ण सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तरी नागरिकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलीस आणि आरोग्य विभागाकडून वेळोवेळी करण्यात येत आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी वैयक्तिक काळजी घेणे अत्यंत गरजेचे असून बाहेर गावच्या नागरिकांना येण्यास बंदी घालण्याची आवश्यकता असल्याचे बोलले जात आहे.कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्याला आळा घालण्यासाठी नागरिकांनी कायद्याचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.

