Pune City News
कोरोनाराष्ट्रीय

‘या’ राज्यातील होणार जनजीवन पूर्ववत सुरू !

केरळ राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये जनजीवन पूर्ववत सुरू होणार असून या जिल्ह्यांना काही प्रमाणात सूट दिली जाणार आहे. या 14 जिल्ह्यांमधील रेस्टॉरन्ट्स उघडली जाणार असून खासगी वाहनांना ऑड-इव्हन नियमाप्रमाणे परवानगी दिली जाणार आहे.

21 दिवसांच्या लॉकडाउननंतर केरळ राज्याने केंद्र सरकारला प्रस्ताव सादर केले होता. या प्रस्तावात केरळने कोरोनाच्या तीव्रतेनुसार रेड, ऑरेन्ज ए, ऑरेन्ज बी आणि ग्रीन असे झोन तयार केले आहेत. पैकी ऑरेन्ज ए, ऑरेन्ज बी आणि ग्रीन अशा झोनमधील प्रतिबंध टप्प्याटप्प्याने हटवण्याची मागणी केली आहे.

केंद्र सरकारने केरळ सरकारचा हा प्रस्ताव शुक्रवारी स्वीकारला असून त्यानुसार केरळमधील रेड झोनमधील प्रतिबंध मात्र कायम राहणार आहेत. आठवडाभराच्या काळात केरळमध्ये फक्त एकाच कोरोना रुग्णाची वाढ झाली असून केरळमध्ये रुग्ण बरे होण्याची गतीही अधिक आहे.

केरळमधील कोट्टयम आणि इडुकी हे दोन जिल्हे तर ग्रीन झोनमध्ये येत असून या जिल्ह्यांमधील जनजीवन सोमवारपासून सामान्य होणार आहे. तर, ऑरेन्ज बी झोनमध्ये येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये थिरुवनंतपुरम, अलप्पुझा, त्रिशूर, पलक्कड आणि वायनाड येथील काही प्रतिबंध हटवले जाणार आहेत.

Related posts

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय

Vishal Khandagale

भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने घेतली महापालिका आयुक्तांची भेट

Vishal Khandagale

“लॉकडाऊन 5.0” मध्ये जाणून घ्या काय बंद राहणार काय सुरू!

Vishal Khandagale

Leave a Comment