पिपरी चिंचवडपुणे शहर

रिक्षा संघटनेचे आरटीओ कार्यालयासमोर बेमुदत चक्का जाम आंदोलन

पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील काही रिक्षा संघटनांकडून (Rickshaw Strike) आज (दि. १२ डिसेंबर) रोजी पुन्हा एकदा सोमवारी बेमुदत रिक्षा बंदची हाक देण्यात आली आहे. बाइक रॅपिडोच्या विरोधात रिक्षा संघटनांनी हा बंद पुकारला आहे. मागील महिन्याच्या  28 नोव्हेंबरला रिक्षाचालकांनी असाच बंद पुकारला होता. त्यावेळी आरटीओ कार्यालयासमोर चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते. आज सोमवारीदेखील असाच चक्का जाम करण्याचा इशारा रिक्षा संघटनांनी दिला.

दुचाकीवरील प्रवासी वाहतूक बंद करण्यात यावी. त्यामुळे आमच्या रोजीरोटीवर गदा  येत आहे, असे रिक्षा संघटनांचे मत आहे. बेकायदा बाइक टॅक्सी विरोधात ‘बघतोय रिक्षावाला’ संघटनेने आक्रमक पवित्रा आज घेतला  व मागच्यावेळी शासनातील अधिकारी आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आश्वासनानंतर रिक्षा संघटनांनी हा संप मागे घेतला होता.

जिल्हाधिकाऱ्यांनी हा बंद करू नका, असे आवाहन रिक्षा संघटनांना केले आहे.
राज्यात सुरू असलेल्या बेकायदेशिररित्या आणि विनापरवानगी चालणाऱ्या बाइक टॅक्सी ॲपवर बंदी घालण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून गृह आणि परिवहन विभागाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांना होणारी असुविधा टाळण्यासाठी रिक्षाचालकांनी 12 डिसेंबरचे आंदोलन करू नये,
असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे. रिक्षाचालकांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रिक्षाचालकांच्या मागण्यांबाबत विचार करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या समिती मध्ये  प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस उपायुक्त (सायबर शाखा), पोलीस उपायुक्त (वाहतूक),
पोलीस उपायुक्त (गुन्हे) आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचा समावेश आहे.
या समितीने 7 डिसेंबरला झालेल्या बैठकीत बाइक टॅक्सी ॲपवर कारवाईबाबत पाठपुरावा करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत.

Related posts

पुणे शहरात आज ५३१३ पॉझिटिव्ह रुग्ण

Vishal Khandagale

पुणे शहरात निर्बंधामुळे 24 तासात ‘कोरोना’चे 2538 नवीन रुग्ण

Vishal Khandagale

खंडणी उकळणाऱ्या टोळीवर मोक्का नुसार कारवाई,

Vishal Khandagale
Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX