आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरमहाराष्ट्रलाईफस्टाइलवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

रेस्टॉरंट व्यवसायिकांसाठी ‘काळा दिवस’ – रेस्टॉरंट असोसिएशन

पुणे पिंपरीसह संपूर्ण जिल्ह्यात ७ दिवसासाठी संध्याकाळी ६ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी आणि हॉटेल, रेस्टॉरंट पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावरून आजचा दिवस हा हॉटेल, रेस्टॉरंट व्यवसायिकांसाठी ‘काळा दिवस’ आहे, असे म्हणत युनायटेड हॉस्पिटॅलिटी असोसिएशन या रेस्टॉरंट असोसिएशनने या निर्णयाला विरोध करत तीव्र नाराजी दर्शवली आहे.

गेल्या लॉकडाऊनचा फटाक्यांमुळे शहरातील ४० % रेस्टॉरंट बंद झाली आहेत. जी सुरु आहेत त्यांचा ५०% सुद्धा व्यवसाय होत नाही. अशा परिस्थितीत आणखी ७ दिवस हॉटेल व रेस्टॉरंट पूर्ण बंद करण्याचा प्रशासनाचा निर्णय हा जाचक आहे. हॉटेल, रेस्टॉरंट चालकांना आज भाडे भरण्याची देखील अडचण असून व्यवसाय करायचा कसा हा प्रश्न त्यांच्या समोर आहे. अशी परिस्थिती असताना आजच्या निर्णयामुळे आम्ही हवालदिल झालो आहे. अन्य व्यापार, भाजीमंडई, दुकाने सुरु असताना हॉटेल व रेस्टॉरंट पूर्णपणे बंद ठेवणे म्हणजे आमच्या क्षेत्रावर अन्याय करण्यासारखे आहे. असे असोसिएशनचे उपाध्यक्ष अजिंक्य शिंदे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, असोसिएशनचे सचिव दर्शन रावल म्हणाले की, गेल्या लॉकडाऊनमुळे हॉटेल व रेस्टॉरंट क्षेत्राचे कंबरडे मोडले आहे. लॉकडाऊन संपला तरी आमच्यावर लागलेले निर्बंध मात्र कायम राहिले इतकेच नाही तर ते अधिक कडक होत गेले. आम्हीही गेले वर्षभर तोटा सहन करीत काम करीत राहिलो. आता मात्र या क्षेत्राला टिकून राहणे देखील शक्य नाही. सरकारने घालून दिलेल्या प्रत्येक नियमांचे आम्ही काटेकोरपणे पालन करण्यास तयार असून आम्हालाही व्यवसाय करायची संधी द्यावी, अशी मागणी या वेळी दर्शन रावल यांनी केले आहे.

Related posts

महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन; भाजपच्या कारभारावर हुकूमशाहीचा आरोप

Vishal Khandagale

कोरोनाच्या दिवसाला एवढ्या चाचण्या !

Vishal Khandagale

उषा मंगेशकर यांना ‘लता मंगेशकर’ पुरस्कार

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX