Pune City News
पुणे शहरशिवाजीनगर

शिवाजीनगर येथील मेट्रो बाधितांचा पुनर्वसनाचा प्रश्न गतीने मार्गी लावा -उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे महामेट्रो व पीएमआरडीए मेट्रो प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या कामगार पुतळा, शिवाजीनगर येथील झोपडीधारकांचे स्थलांतरण व पुनर्वसनाचा प्रश्न गतीने मार्गी लावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केल्या.

शिवाजीनगर येथील कामगार पुतळा व राजीव गांधी नगर येथील मेट्रोमुळे बाधित होणाऱ्या तसेच सिद्धार्थ नगर येथील झोपडीधारकांच्या पुनर्वसनाबाबत आज उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार सुनील टिंगरे, अण्णा बनसोडे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख उपस्थित होते.

Related posts

जंम्बो रुग्णालयामधील रुग्णांसाठी “ऑक्सीकुल“ या ब्रँडने आयुहेल्थ ; आयुर्वेदिक तत्वयुक्त २५००० पाण्याच्या बाटल्या भेट

Vishal Khandagale

पुणे शहरांत ऑटोरिक्षाच्या भाडेदरात 8 नोव्हेंबरपासून होणार वाढ !

Vishal Khandagale

सोमवारपासून सर्व दुकाने, मॉल्स,हॉटेल्स उघडणार…

Vishal Khandagale

Leave a Comment