गुन्हे विषयक

काळ्या जादूच्या उपचारासाठी घातला 6 लाख 80 हजारांना गंडा; भोंदूवर गुन्हा दाखल

तुमचे आजारी पडण्याचे कारण तुमच्या घटस्फोटित पत्नीने तुमच्यावर काळी जादू केली आहे.

तुम्हाला त्यातून बाहेर पडण्यासाठी कबुतरे आणावी लागतील, असे सांगून आर्थिक फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबावर पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी काेंढवा पाेलीस ठाण्यात कुतुबुद्दीन नजमी (रा. काेंढवा, पुणे) व हकिमउद्दीन मालेगाववाला ( रा.काेंढवा खुर्द, पुणे) या आराेपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अबिझर जुझर फतेपुरवाला (वय- ३६  वर्षे, रा.काेंढवा बुद्रूक, पुणे) यांनी पाेलीसांकडे तक्रार केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार अबिझर यांचा भाऊ हुझेफा याचे २०१० मध्ये गुजरातमधील मुलीसाेबत लग्न झाले हाेते.

पण, २०१७ मध्ये त्यांचा संमतीने घटस्फाेट घेतला हाेता. चार महिन्यांपूर्वी हुझेफा हा तापाच्या कारणामुळे आजारी पडला हाेता.

त्यानंतर अनेकदा उपचार करूनही प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी धर्मगुरु सय्यदना सैफुदीन यांना मुलाची तब्येत ठिक हाेण्यासाठी प्रार्थना करण्याची विनंतीसाठी गेले हाेते.

Related posts

मामानेच केले भाचीचे अन तिच्या प्रियकराचे अपहरण

Vishal Khandagale

विमानतळ पोलीस ठाण्यातील दोन पोलीस शिपाई निलंबित: हप्ता वसुली प्रकरण उजेडात

Vishal Khandagale

खंडणी उकळणाऱ्या टोळीवर मोक्का नुसार कारवाई,

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX