Pune City News
गुन्हे विषयक

धायरी परिसरात हॉटेल व्यवस्थापकाची आत्महत्या

PUNE CITY NEWS :- पुण्यातील धायरी परीसरात एका हॉटेल व्यवस्थापकाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. लॉकडाऊन नंतर सर्वांचेच उद्योगधंदे बंद झाले आहेत. त्यामुळे सर्वजण संकटात आहेत.

अशा परिस्थितीत अनेक जण मानसिक तणावातून आत्महत्या करत असल्याचे पहायला मिळत आहे. त्याचाच परिणाम म्हणून आज या हॉटेल व्यवस्थापकाने आत्महत्या केली असल्याची माहिती समोर येत आहे.

प्रेमनाथ कृष्णा शेट्टी (वय ४३ वर्षे, रा. हॉटेल राज, धायरी, ता. हवेली जि. पुणे) असं आत्महत्या केलेल्या हॉटेल व्यवस्थापकाचं नाव आहे

आज( गुरुवारी) सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडीस आला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

प्रेमनाथ हे गेल्या सात वर्षांपासून ‘हॉटेल राज’ चालवत होते. लॉकडाऊनमुळे गेल्या चार महिन्यांपासून हॉटेल बंद होतं.

त्यामुळे नैराश्य येऊन त्यांनी हॉटेलमध्येच पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. घटनास्थळी सुसाइड नोट मिळाली असून लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद आहे.

त्यामुळे मला नैराश्य आल्यानं मी आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये’ असं त्यात नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस करीत आहेत.

Related posts

पेट्रोल पंपावर दारोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पकडले

Vishal Khandagale

भाजपाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना धक्काबुक्की चा प्रयत्न !

Vishal Khandagale

बहिणीपासून लांब रहा, असे म्हणत मुलीच्या भावाचा तरुणावर हल्ला

Vishal Khandagale

Leave a Comment