वानवडी परिसरात दि. १० जुलै रोजी एका अल्पवयीन मुलाच्या खुनाचा प्रकार घडला होता. तसेच त्या मुलाचा मृतदेह दगडाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवल्याचे समोर आले होते. या खुनाचा तपास करण्यात कोंढवा पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.
रोहित गौतम बनसोडे (वय २७), अजय विजय गायकवाड (वय २२ ), श्रीकांत भीमराव साठे (वय २०), अक्षय अनिल जाधव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
अझान जहीन अन्सारी (वय १२) असे खून झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे.
याबाबत अन्सारीच्या आईने आपला मुलगा हरवल्याची तक्रारही पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांकडून या खुनाचा तपास करत होते. पोलिसांना या खुनाचा तपास करण्यात यश आले आहे.

