Pune City News
गुन्हे विषयकपिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

50 लाखांच्या खंडणीची मागणी!

PUNE CITY NEWS – कुख्यात छोटा राजन ची पुतनी व तिच्या साथीदारांच्या मदतीने पुण्यात 50 लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कौटुंबिक वादाचे प्रकरणी मिटवण्यासाठी पुतणीने शहरातील एक तरुणाकडे ही खंडणी मागितली आहे. पुणे गुन्हे शाखेने खंडणी घेताना एकाला पकडले असून या तिघांविरोधात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर:-कुख्यात छोटा राजन ची पुतणी प्रियदर्शनी निकाळजेने आपल्या दोन साथीदारांसह हा खंडणीचा कट रचला होता. त्यातील एक जण खंडणी घेण्यासाठी अरोरा टॉवर परिसरात आला होता.25 लाखांची खंडणी घेताना त्याला पुणे गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आणि चौकशीअंती गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीत तरुणाने खंडणी मागितल्याची तक्रार दाखल केली होती. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी सापळा रचून खंडणी प्रकरणातील एकाला अटक केली आहे.
तक्रारदार तरुणाची पत्नी आणि मेहुणी यांचा अनेक दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. हा वाद मिटवण्यासाठी कुख्यात छोटा राजन ची पुतणीने आपल्या दोन साथीदारांसोबत संगनमत करून तक्रारदारविरोधात गुन्हा दाखल केला होता.
हा गुन्हा मागे घेण्यासाठी त्यांच्यात वाद सुरू झाला. हे प्रकरण मिटवण्यासाठी 50 लाखांची खंडणी मागितली होती.

Related posts

इराणमधून “234” भारतीय मायदेशात!

Vishal Khandagale

राज्यात आतापर्यंत 50 हजार गुन्हे !

Vishal Khandagale

संचारबंदी झुगारून मंडईत गर्दी

Vishal Khandagale

Leave a Comment