Pune City News
गुन्हे विषयकपिपरी चिंचवडपुणे

रेमडिसिव्हर इंजेक्शनची बेकायदा विक्री; तिघांवर गुन्हा

रेमडेसिव्हीर इंजेक्शनची बेकायदेशीररीत्या जादा दराने विक्री केल्या प्रकरणी निगडी पोलिसात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाहिद जब्बार शेख (वय ३४), विजय बबन रांजणे (वय ३५), वैष्णवी राजेंद्र टाकोरकर (वय ३०, तिघेही रा. ओटास्कीम, निगडी) अशी आरोपींची नावे आहेत.

याबाबत अधिक महिती अशी की, फिर्यादीच्या आईला कोरोनाची लागण झाल्याने त्यांना २३ ऑगस्टला आकुर्डीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

कोरोनावरील उपचारासाठी अत्यावश्यक असलेले रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळत नव्हते. मात्र रुग्णालयात नोकरीस असलेल्या आरोपी शाहिद याने बेकायदेशीररित्या इंजेक्शनची जादा दराने विक्री केली.

पाच हजार ४०० रुपयाला एक इंजेक्शन असताना फिर्यादीकडून दोन इंजेक्शनचे १५ हजार ५०० रुपये इतकी रक्कम घेतली. तसेच वडिलांना देखील कोरोनाची लागण झाल्याने त्यांनाही त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यांना इंजेक्शनची गरज असल्याने शाहिदचे इतर दोन साथीदार रांजणे व टाकोरकर यांनी २२ सप्टेंबरला फिर्यादीच्या वडिलांच्या उपचारासाठी जादा दराने एका इंजेक्शनची सहा हजार रुपयांना विक्री केली.

याबाबत फिर्यादीने निगडी पोलिसात तक्रार अर्ज दिला होता. त्यावर चौकशी केल्यानंतर निगडी पोलिसांनी बुधवारी (दि.२३) सायंकाळी तिघांवर जीवनावश्यक वस्तू कायदा, औषध व सौंदर्य प्रसाधन कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुस्तफा अब्दुलगफार तांबोळी (वय १९, रा. पाटीलनगर, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे.

Related posts

पुणे शहर पोलीस दल कल्याण’ साठी ५० लाख रूपयांचा धनादेश हस्तांतरीत

Vishal Khandagale

कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे; डॉ. म्हैसेकर

Vishal Khandagale

जेईई ऍडव्हान्स परीक्षेत पुण्याचा चिराग फलोर देशात प्रथम

Vishal Khandagale

Leave a Comment