Pune City News
गुन्हे विषयकपिपरी चिंचवड

चिंचवडमध्ये चार दुकाने फोडली….

Pune City News :- लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर चिंचवड येथे चोरट्यांनी मेडिकलची चार दुकाने फोडली आहेत. ही घटना बुधवारी 1 एप्रिल रोजी पहाटे घडली.

चिंचवड येथील सन्मती मेडिकल, महावीर मेडिकल, रिव्हायवल मेडिकल आणि आणखी एक दुकान अशी फोडलेल्या दुकानांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी चिंचवड गावातील चार औषधाची दुकाने फोडली.शेवटचे रिव्हायवल या दुकानाचे शटर उचकटत असताना समोरील इमारतीमध्ये राहणाऱ्या एका नागरिकाने चोरट्यांना हटकले. यामुळे चोरटे दुचाकीवरून पळून गेले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. चोरीमुळे पोलिसांसमोरील आव्हान वाढत चालले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

Related posts

हवेली तालुक्यातील आठ तासांत बंदी हटवली ; ये- जा करण्यास परवानगी

Vishal Khandagale

ब्रेकिंग! राज्यात कडक निर्बंध लावावे लागतील! , उद्या परवा जाहीर करु : मुख्यमंत्री

Vishal Khandagale

कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

Vishal Khandagale

Leave a Comment