Pune City News
गुन्हे विषयकमहाराष्ट्र

विघ्नहर गणपती मंदिर चोरी प्रकरणातील आरोपींना अटक

तीर्थक्षेत्र ओझर येथील विघ्नहर मंदिरातून गणपतीच्या मस्तकावरील सुवर्ण लेप लावलेली छत्री चोरी झाली होती. ती छत्री चोरणाऱ्या दोन दरोडेखोरांना आळेफाटा पोलिसांनी बेल्हा परिसरात दरोडा टाकताना रंगेहाथ पकडले आहे.

विठ्ठल पतवे (वय ४७) आणि सोन्या पतवे (वय २७) दोघेही. रा. अकोले या दोन आरोपींना अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून त्यांचे बाकीचे साथीदार फरार आहेत. त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

या आरोपींकडून चॅापर, कोयता, पहाने, कटावणीव दुचाकी असे साहित्य जप्त केले आहे. अशी माहिती आळेफाटा पोलीस ठाण्याचे निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी दिली.

याबाबत माहिती अशी की, ओझरच्या विघ्नहर मंदिरातून २७ जुलैला साधारण दोन किलो वजनाच्या चांदीत घडवलेली सुवर्णलेपीत छत्री चोरट्यांनी पळवून नेली होती. तर गाभाऱ्यात असलेल्या दोन दानपेट्यांपैकी एक दानपेटी फोडून रक्कम लांबवली होती.

ही चोरी देखील याच आरोपींनी केल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी आरोपींना ओतूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अधिक तपास सुरू आहे.

Related posts

पुणे- नाशिक महामार्गावर शिवशाही बसचा अपघात; दहाजण जखमी

Vishal Khandagale

नगर रोडवरील वाहतुकीतील बदल : प्रवाशांना दिलासा, पण स्थानिकांमध्य े नाराजी !

Vishal Khandagale

मुंबई आयआयटीचे वर्षभरासाठी ऑनलाईन वर्ग भरणार

Vishal Khandagale

Leave a Comment