Uncategorized

नगररोड वरील वैकफील्ड वसाहतीची संपूर्ण ड्रेनेज लाईन बिल्डरने केली बंद !

2 दिवसापासून पडत असलेल्या पाऊसामुळे रामवाडी वैकफील्ड वसाहत, वीट भट्टीवस्ती व झंकार सोसायटी मध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते तसेच वैकफील्ड वसाहती मधील घरांमध्ये देखील पाणी घुसले असल्याने सदर भागाची  पुणे महानगरपालिकाचे मलनिःसारण देखभाल व दुरुस्तीचे विभाग उपअभियंता पाटील साहेब यांनी युवक कॉंग्रेस वडगाव शेरी मतदारसंघाचे अध्यक्ष अभिजीत रोकडे यांच्या तक्रारी वर आज पाहणी केली व त्यांच्या असे पाहणीत आले  की वैकफील्ड वसाहत व झंकार सोसायटीच्या ड्रेनेजचे मॅनहोल दुग्गड बिल्डरचे खोदाई काम चालू असताना त्याचा सगळा राडारोडा उचलून तो शेजारील सर्वे नं. 30/1 मध्ये सिद्धिविनायक ग्रुप अखिल अगरवाल या बिल्डरच्या जागेत बेकायदीशीर टाकून वैकफील्ड वसाहत व झंकार सोसायटीच्या सार्वजनिक ड्रेनेजच्या मॅनहोलवर माती-दगडाची भर टाकून चेंबर झाकल्याने ड्रेनेजच्या चेंबर मध्ये मोठ्या प्रमाणावर माती गेल्याने संपूर्ण ड्रेनेज लाईन बंद आहे

 वैफील्ड वसाहतीतील नागरिकांच्या घरात मोठ्या प्रमाणावर पाणी घुसल्याने नागरिकांचे नुकसान व हाल झाले 2 दिवस सतत पाऊस असल्यामुळे काही नागरिकांना दोन दिवस पाण्यातच काढावे लागले.अभिजीत रोकडे यांनी पुणे सिटी न्यूज़ च्या प्रतिनिधीला माहिती दिली

तसेच राडारोड्याची भर टाकताना पुढे गेलेल्या ड्रेनेज लाईनच्या मेन मॅनहोल वरून डम्परच्या लोड गाड्या सतत ये जा केल्याने मॅनहोल खचून त्यामध्ये मोठे-मोठे दगड टाकून मॅनहोल संबंधित बिल्डरकडून बुजवण्यात आले. या कारणास्तव सर्वे नं.30/1 येथील दुग्गड बिल्डरवर कठोर व दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी मा.मुख्य कार्यकारी अभियंता मलनि:सारन देखभाल व दुरुस्ती विभाग शिर्के मॅडम, पाटील साहेब, वॉर्ड ऑफिसर बनकर साहेब यांच्याकडे केली.

तसेच कोरोनामुळे निधी उपलब्ध नसल्यामुळे तात्पुरते पाणी पुढे जावे यासाठी पुणे मनपाच्या मार्फत पोकलेन व जेसीबी लावून दगडाने तुंबलेले ड्रेनेज लाईन फोडून घेऊन पाणी जाण्यासाठी तात्पुरता नाला बनवून घेण्यात आला व येत्या आठवडा भरात नवीन ड्रेनेजची लाईन टाकण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. तसेच सदर भागातील सर्व चेंबर साफ करून घेण्यात आले. यावेळी वॉर्ड ऑफिसचे जावेद सय्यद व माझे सहकारी शेवराव यादव,विपीन खंडागळे, प्रवीण साबळे, किशोर डोळस,रवींद्र ठोकळ, रोहित बोधक, अनिकेत शिंदे, दगडू पिल्ले यांनी मदतकार्यात विशेष सहकार्य केले.

Related posts

ग्रामीण भागातील कोरोना उपाययोजनाबाबत- उपमुख्यमंत्री अजित पवार

Vishal Khandagale

विमानातील मधलं सीट रिकामं ठेवा; DGCA चे निर्देश

Vishal Khandagale

कोरोना: सीबीएसईच्या परीक्षेस स्थगिती

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX