महाराष्ट्र

निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झालाय: अजित पवारांची टीका

अजित दादा

सामजिक न्याय मंत्री  धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप होत असताना भाजप नेते निलेश राणेंनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली होती. राणेंच्या या टीकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

पुण्यात सर्किट हाऊस येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला . यावेळी ते म्हणाले की, ते काही बोलतात आणि त्यावर मी बोलायाचे का? पण एक सांगतो त्या निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, अशा शब्दात अजित पवारांनी राणेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

राष्ट्रवादीत चाललंय काय? इतके गुन्हेगार मिळून एका जेलमध्ये नसतील तेवढे एका पक्षात आहेत, अशी टीका निलेश राणे यांनी केली होती. त्यामुळे आता राणे पवारांच्या टीकेवर काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Related posts

कोरोनाबाधितांच्या संपर्कात शहरातील 337 जण !

Vishal Khandagale

ठाकरे सरकार कोरोना रोखण्यास अपयशी : सुब्रमण्यम स्वामीं

Vishal Khandagale

“मला राज्यसभेची अपेक्षाच नव्हती” एकनाथ खडसे

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX