पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख ७३ हजार ७४७ इतकी आहे. त्यापैकी १ लाख ३५ हजार ३९रुग्णांनी कोरोनावर मात केली असूनत्यांना घरी सोडण्यात आले आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
ॲक्टीव रुग्ण संख्या ३४हजार ६३६ आहे. कोरोनाबाधित एकूण ४ हजार ७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण २.३४ टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ७७.७२ टक्के आहे. आजपर्यंत पुणे जिल्ह्यात ३ हजार ४३३ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.

