Pune City News
पुणे

पत्रकार पांडुरंग रायकर यांचे निधन

PUNE CITY NEWS :-  TV9 या खाजगी वृत्तवाहिनीसाठी रिपोर्टिंग करणारे पांडुरंग रायकर (वय 42) यांचे आज पहाटे साडेपाच वाजता निधन झालं. पांडुरंग रायकर यांना कोरोना संसर्गाचे निदान झाले होते. काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील एका रूग्णालयात उपाचर सुरू होते. मात्र आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. श्रीगोंदे येथील रहिवासी असलेले पांडुरंग रायकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे आणि आई-वडील असा परिवार आहे. अभ्यासू पत्रकार म्हणून पांडुरंग रायकर यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

पत्रकार मृत्यूप्रकरण; चौकशीचा आदेश

पत्रकार पांडुरंग रायकर यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. वेळेत उपचार न मिळाल्याने निधन झाले असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

पुणे विभागीय आयुक्तांना याचा अहवाल मागितला आहे. पत्रकारांनी पांडुरंग यांच्यावर उपचार होण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. मात्र, ते अयशस्वी ठरले.

सर्वसामान्य नागरिकांना या जम्बो सेंटरमध्ये पाणीही मिळत नाही. खाजगी हॉस्पिटलमध्ये बेडसही मिळत नाही. मंगळवारी रात्री १० पर्यंत पांडुरंग यांच्यावर उपचार करण्यासाठी बेड मिळाला नाही.

१०० कोटी रुपये खर्च करून जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले. मात्र, त्या ठिकाणी रुग्णवाहिका न मिळाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

या हॉस्पिटलमध्ये आरोग्य यंत्रणा उपलब्ध नाही. पांडुरंगचे कुटुंब मोठ्या दुःखात आहे. सर्वाधिक मृत्यू पुणे शहरात होत आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही पांडुरंगच्या मृत्यू प्रकरणाचे चौकशीचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी, पुणे विभागीय आयुक्तांशी चर्चा करण्यात आली आहे.

Related posts

अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा

Vishal Khandagale

मंत्रालयात सामान्यांना प्रवेश बंद!

Vishal Khandagale

“दलित सेना” वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

Vishal Khandagale

Leave a Comment