Pune City News
पुणेमहाराष्ट्रराष्ट्रीय

पुणे व पिंपरी चिंचवड मधे जमाव बंदी लागू व संचारबंदी नाही!

Pune City News:- विभागीय आयुक्त मा दिपक म्हैसकर व पुणे जिल्हाधिकारी यांची दि.16 मार्च 2020 ला संयुक्त पत्रकार परिषदेत माहीती दिली.
जर्मनी हा देश त्या 7 देशा पैकी एक आहे जिथे कोरोना विषाणू चे संक्रमण मोठ्या प्रमाणात झाले आहे व एक प्रवसी 2 महिने जर्मनी मधे राहिला होता म्हणून आपण त्याला नायडू हॉस्पिटल मधे विविध चाचण्या साठी नेले आहे.
मा मुख्यमंत्री व मुख्यसचिव,आरोग्य सचिव यांनी आज सकाळी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांची वीडियो कॉन्फरन्स द्वारे काही सुचना केल्या आहेत.
ज्या 7 देशा मधून येणार्या प्रवाशांना वर लक्ष ठेवण्याची यादी अघोदर केली आहे त्यामधे आजुन 3 देशाची नावे जोडण्यात येत आहे (सौदी अरेबिया, दुबई, यूनाइटेड अमेरिका) यांचा समावेश करण्यात आला आहे.
पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहरात जमावबंदी लागू केली आहे पण संचारबंदी नाही या साठी काही अटी काही तुरळक ठिकाणी वापरण्यात येतील.
नागरिकांनी महत्वाच्या काम असेल लोकांच्या भेटिगाठी घ्याव्या अन्यथा भेटिगाठी व गर्दीची ठिकाणे टाळावी.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, शहरासह जिल्ह्यात साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत आदेश आहेत. स्वतंत्र १४४ चे आदेश नाहीत. १४४ (१) च्या आदेशानुसार प्रशासनाचे आदेश न पाळणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी आहे, याची अंमलबजावणी पोलीस करतील.पुण्यात सध्या कुठेही संचारबंदी किंवा जमावबंदी नाही. यापूर्वीच महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्र तसेच लगतच्या क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यापुढे संपूर्ण पुणे जिल्हयातील सर्व शाळा बंद राहतील असे त्यांनी स्पष्ट केले. यात्रा, जत्रा, मोठे उत्सव याठिकाणी होणारी गर्दी टाळण्याचे आवाहन यापूर्वीच करण्यात आले असून कुठेही  गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्याचे ते म्हणाले. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. एकमेकांसोबतचा संपर्क टाळावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राम यांनी केले आहे.

Related posts

26 कंपन्यांचे होणार खासगीकरण

Vishal Khandagale

राज्य सरकारच्या अटींचा अडथळा : विरोधी पक्षनेते

Vishal Khandagale

मोरगावच्या मोरेश्वर गणपती मंदिरात पहिल्यांदाच शुकशुकाट….

Vishal Khandagale

Leave a Comment