गुन्हे विषयकपुणे

पुणे शहर युवक कॉंग्रेस कडून “अर्णब गोस्वामी” विरुद्ध गुन्हा दखल करण्याची मागणी!

Pune City News:- पालघर मध्ये घडलेल्या दोन साधूंसह वाहन चालक अशा 3 जणांच्या निर्घृण हत्येच्या पार्श्वभूमीवर अर्णब गोस्वामी याच्या रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रा मध्ये गोस्वामी यानी समाजात जातीय आणि धार्मिक विद्वेषाची भावना पसरविण्यासाठी जाणीवपूर्वक हिंदू-मुस्लिम समाजामध्ये सामाजिक विद्वेष पसरविणाऱ्या टिप्पणी करून समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.तसेच पालघर झुंडबळी प्रकरणातील आरोपीना दि.17 एप्रिल लाच गुन्हे दाखल करून अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले व सदरचा गुन्हा न्यायप्रविष्ट आहे हे माहित असूनही गोस्वामी ह्याने सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी सदर प्रकार केला आहे.या सोबतच काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या संदर्भातही अत्यंत खालच्या दर्जाची भाषा वापरून वैयक्तिक पातळीवर घृणास्पद टिप्पणी केली होती. असे अरोप पुणे शहर युवक कॉंग्रेस च्या वतीने करण्यात येत आहे

यावेळी पुणे शहर युवक कॉंग्रेस चे अध्यक्ष विशाल मलके हे संतप्त प्रतिक्रिया देत म्हणाले की’या प्रकाराला पत्रकारिता म्हणता येणार नाही’. सामाजिक वातावरण कलुषित करणा-या “अर्णब गोस्वामी” विरोधात गुन्हा दाखल करून लवकरात लवकर त्याला अटक करण्याची मागणी पुणे शहर युवक काँग्रेस व वडगांव शेरी विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने करीत आहोत. बंधुभावाचा संदेश देणाऱ्या आपल्या देशात सामाजिक विद्वेष पसरविणे कदापि मान्य होणार नाही. देशाच्या एकतेसाठी आणि अखंडतेसाठी ते घातक राहील.हे अत्यंत गंभीर आहे. कोरोना संकटाच्या काळात महाराष्ट्रासह देशाचे सामाजिक वातावरण बिघडवण्याचा हा अत्यंत निंदनीय प्रकार आहे.हे अत्यंत दुख:द आणि अमानवीय कृत्य आहे. मात्र सदर घटनेत कोणताही धार्मिक विद्वेषाचा दृष्टीकोन नाही, असे असतांनाही काही माध्यमे व राजकीय व्यक्ती या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत.पुणे शहर युवक काँग्रेस च्या वतीने अर्णब गोस्वामी चा जाहीर निषेध केला.

अर्णब गोस्वामी याला तात्काळ अटक व्हायलाच हवी यासाठी पुणे शहर युवक काँग्रेस च्या वतीने पुणे शहर पोलीस परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त यांना निवेदन देण्यात आले.

Related posts

विमाननगर मध्ये भामा-आसखेड चे पाणी दाखल.

Vishal Khandagale

येरवडा जेलमधील महिलांच्या खुल्या कारागृह ; शेतातील 3 चंदनाच्या झाडांची चोरी

मंत्रालयात सामान्यांना प्रवेश बंद!

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX