गुन्हे विषयक

पूजा चव्हाण- भाजप आणि लीगल जस्टीसचे दोन्ही खटले कोर्टाने फेटाळले

टिकटॉक स्टार पूजा चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणाची वानवडी पोलिसांनी चौकशी करावी. त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, यासाठी दाखल झालेले दोन्ही खटले न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. फोटो आणि कॉल रेकॉर्डिंग हे गुन्हा दाखल करण्यासाठी सक्षम पुरावे नाहीत, असे नमूद करीत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रोहिणी पाटील यांनी हे खटले फेटाळले.
भारतीय जनता पार्टीच्या वकील आघाडीच्या अध्यक्षा ॲड. ईशाना जोशी आणि लीगल जस्टिस सोसायटीतर्फे ॲड. भक्ती पांढरे यांनी खटला दाखल करण्यासाठी अर्ज केले होते. त्यानुसार या प्रकरणात दोन खासगी दावे देखील झाले होते. या प्रकरणात राजकीय व्यक्तीचा सहभाग आहे. त्यामुळे अद्याप या घटनेची सखोल चौकशी झालेली नाही. या प्रकरणात कोणाचा हात नाही, असे पोलिसही स्पष्ट करीत नाहीत. त्यामुळे या प्रकरणाचा योग्य पद्धतीने तपास व्हावा. त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, असे आदेश न्यायालयाने पोलिसांना करावेत, यासाठी हे दावे दाखल करण्यात आले होते.
पूजा यांच्या आत्महत्येनंतर मा. मंत्री संजय राठोड यांच्यासोबतचे त्यांचे फोटो आणि कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले होते. त्यात असलेल्या संभाषणावरून तसेच त्यांच्यातील संबंधाबाबत असलेल्या चर्चेवरून हे प्रकरण चांगलेच ढवळून निघाले आहे.
समाज माध्यमावर उपलब्ध असलेले फोटो आणि व्हायरल झालेले कॉल रेकॉर्डिंग यावरून गुन्हा दाखल करण्यासाठी सक्षम पुरावे नाहीत. पोलिसांनी या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. त्याचा तपास अद्याप सुरू आहे, असे न्यायालयाने नमूद केले आहे.
गुन्हा दाखल होण्यासाठी आम्ही पोलिसांत तक्रारअर्ज केला होता. त्याची पोहच पावती न्यायालयात दाखल केली आहे. मात्र पोलिसांना त्याची दखल घेतली नव्हती. न्यायालयाने दिलेल्या या निकालाच्या विरोधात आम्ही सत्र न्यायलयात दाद मागणार आहोत.
– ॲड. ईशाना जोशी, अध्यक्षा, भारतीय जनता पार्टीच्या वकील आघाडी

Related posts

बँक अधिकाऱ्यांनीच काढले मृत व्यक्तीच्या खात्यातून पैसे

कोंढव्यात अवैध दारू विक्रेत्याच्या घरात १ कोटी ८५ लाखांची रोकड जप्त !

Vishal Khandagale

सैन्य भरती परीक्षेचा पेपर फुटला होता ; पुणे शहर पोलिसांची मोठी कारवाई

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX