Pune City News
गुन्हे विषयकपुणे शहर

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, अश्लील व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेल केले

पुणे शहर :- अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून तिला बावधन टेकडीवर नेहून तिला अश्लील बोलून विनयभंग केला. तर मुलीचे आईवडील मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर घरात शिरून तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच त्याचा व्हिडीओ तयार करून सतत तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली आहे. याबाबत 19 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. 2017 ते 2021 या कालावधीत हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित तरुणी सतरा वर्षाची असताना आरोपीने बावधन परिसरात तिचा रस्ता आडवला. तिला दमदाटी करून बावधन परिसरातीलच एका टेकडीवर नेले. तिथे तिच्या सोबत अश्लील चाळे केले. त्यानंतर 2019 मध्ये पीडित मुलीचे आई-वडील घराबाहेर गेले असताना आरोपीने जबरदस्तीने घरात प्रवेश केला आणि तिच्यावर बलात्कार केला. या संपूर्ण प्रकरणाचा त्यांनी व्हिडिओ देखील काढला होता. हा व्हिडिओ तिच्या आई-वडिलांना दाखवण्याची धमकी देऊन तो तिला त्रास देऊ लागला.

दरम्यान याच व्हिडिओचा स्क्रीनशॉट काढून त्याने पीडित मुलीच्या मित्रालाही सोशल मीडियाद्वारे पाठवला. त्यानंतर पीडित मुलींनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Related posts

50 लाखांच्या खंडणीची मागणी!

Vishal Khandagale

पुणे ग्रामीण पोलिसांनी चंदन तस्करांना पकडले…

Vishal Khandagale

शहरातील परिस्थिती नियंत्रणात, तूर्त लॉकडाऊन नको : महापौर

Vishal Khandagale

Leave a Comment