कसबागुन्हे विषयकपुणेपुणे शहर

आंदेकर टोळीच्या संघर्षात युवकाचा खून

पुण्यात पुन्हा एकदा टोळी युद्धाचा भडका उडाला असून वनराज आंदेकर खून प्रकरणाशी संबंधित आरोपी गणेश कोमकर यांचा मुलगा आयुष गणेश कोमकर  याचा नाना पेठ परिसरात गोळीबार करून खून करण्यात आला. या घटनेमुळे पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांचा धुमाकूळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशिरा आयुष कोमकरवर अज्ञात हल्लेखोरांनी  गोळीबार करून जीवघेणा हल्ला करून खून केला . त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

वनराज आंदेकर यांच्या खुनाला एक वर्ष पूर्ण होताच आंदेकर टोळीने बदला घेण्याच्या हालचाली सुरू केल्याची माहिती आधीच पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच हा कट उधळून लावला होता. तरीदेखील नाना पेठेत झालेला हा खून आंदेकर टोळी व प्रतिस्पर्धी गट यांच्यातील संघर्ष किती तीव्र आहे हे स्पष्ट करणारा ठरला आहे.

या खुनामुळे आंदेकर टोळीचा गुन्हेगारी इतिहास आणि त्यांचे शहरातील वर्चस्व पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. गेल्या चार दशकांपासून आंदेकर टोळी व प्रतिस्पर्धी गटांमध्ये सुरु असलेल्या संघर्षामुळे पुणे शहरात अनेक रक्तरंजित घटना घडल्या आहेत.

घटनेनंतर पोलिसांनी नाना पेठ परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. गुन्हे शाखेकडून तपास सुरू असून हल्लेखोरांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Related posts

मातीचे सोने होईल; पुण्यात सराफाला ५० लाखांचा गंडा

Vishal Khandagale

खराडी, चंदननगर व वडगावशेरी स्वयंस्फूर्तीने बंद!

Vishal Khandagale

सासवड येथे जुगार अड्ड्यावर छापा; ३० जण ताब्यात

Vishal Khandagale
Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.