गुन्हे विषयक

पोटच्या मुलीवरच नराधम बापाचे अत्याचार; 15 तारखेपर्यंत कोठडी

crime

कोंढवा परिसरात नराधम पित्यानेच पोटच्या मुलींवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर घडली आहे. गेल्या चार वर्षांपासून वडीलच मुलीवर लैंगिक अत्याचार करत होते.

याबाबत मुलीच्या आईने फिर्याद दिल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोंढवा परिसरात आरोपी पत्नी आणि चार मुलींसह वास्तव्यास आहे. त्याचा फर्निचरचा व्यवसाय आहे.

आरोपी दोन्ही नऊ वर्षांच्या मुलीवर २०१६ पासून लैंगिक अत्याचार करत होता. या प्रकाराची माहिती पत्नीला मिळाली. त्यावर पतीने पत्नीला कोणाला सांगितलं तर मुलींना ठार मारुन टाकेन अशी धमकी दिली.

या भीतीपोटी पत्नी कोणाला सांगत नव्हती. पण त्याचवेळी हा संपूर्ण प्रकार एका वकिलाला समजल्यानंतर मुलीच्या आईला धीर देत तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आणलं.

यावेळी तिने सगळा प्रकार सांगितला. यानंतर कोंढवा पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून १५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Related posts

पुण्यातील सहकारनगर परिसरात चप्पल व्यावसायिकाची आत्महत्या

Vishal Khandagale

विमाननगर मध्ये सात कोटीं रुपयांच्या बनावट नोटा जप्त !

Vishal Khandagale

दुसऱ्या मजल्यावरून गतीमंद मुलीला खाली फेकलं !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX