Pune City News
पुणे

बालेवाडीत दसरा चौकात सिलेंडरचा भीषण स्फोट !

Pune City News:- बालेवाडी दसरा चौकत टपरया व आठ-दहा पत्र्याची शेड मधे भाजी,चिकन,भंगार,हार,चहाचे छोटेखाणी हॉटेल,व नम्रता गॅस एजन्सीचे दुकाने आहेत सदर ठिकाणी अनाधिकृत सिलेंडर भरण्याचे काम करत असताना. काल रात्री नऊच्या दरम्यान या ठिकाणी सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली.या ठिकाणी सिलेंडर साठा होता त्यातील सिलिंडरचा स्फोट होऊन आजूबाजूचे सहा दुकाने पेटली. सिलेंडर फुटल्यामुळे खूप आवाज आल्याने रहिवाश्यानी या ठिकाणी गर्दी केली व आजुबाजुच्या रहिवाश्यान कडून अग्निशमन,पोलिसांना कळविण्यात आले. या ठिकाणी अग्निशमन दलाच्या यंत्रणे कडून चार अग्निशमन बंब बोलावूनआग विझवण्यात आली या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण या ठिकाणी दुकानांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सिलेंडर दुकानातून अजून 14 भरलेली सिलेंडर बाहेर काढण्यात आली ही सर्व सिलेंडर भरलेली असल्याचे समजले.व वेळेत अग्निशमन कडून गॅस सिलेंडर बाहेर काढण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

Related posts

मुठा, रिहे खोर्‍यातील ग्रामस्थांसाठी नवीन पीएम पीएमएल बससेवा

Vishal Khandagale

पुण्यात ‘होम क्वारंटाइन’ असलेले रुग्ण बेपत्ता

Vishal Khandagale

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली संजीवन समाधीची पहाटपूजा

Vishal Khandagale

Leave a Comment