Pune City News :- पुणे शहर विभागातील (परिमंडळ ४) एका पोलीस कर्मचाऱ्याच्या आईला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे.
त्यांच्यावर सध्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिस कर्मचाऱ्यासह त्याच्या भावाला देखील तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलीस कर्मचारी हा पूर्व भागातील एका पोलिस वसाहतीत वास्तव्यास आहे. परिमंडळ चार विभागातील एका पोलीस स्टेशनला तो कार्यरत आहे.दोन दिवसांपुर्वी त्यांच्या आईची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.मात्र येथून त्यांना वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. वायसीएम येथे त्यांची तपासणी केली असता त्यांना कोरोना संसर्ग झाल्याचा अहवाल गुरुवारी रात्री मिळाला. त्यानंतर विषाणू झाल्याचे निदान झाले.
previous post

