राज्यातील वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नव्याने गाईडलाईन जारी केल्या आहेत. त्यानुसार आज रात्री ८ वाजल्यापासून ते पहाटे ७ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच चौपाट्या, उद्याने, मॉल, सिनेमागृह यासाठीही सरकारने अनेक निर्बंध घातले असून हे निर्बंध १५ एप्रिलपर्यंत लागू करण्यात आले आहेत.
काय आहेत नवीन नियमावली ? :
● आज रात्री ८ वाजल्यापासून ते सकाळी ७ वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.
● या नियमाचे उल्लंघन केल्यास प्रत्येकी १ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
● आज रात्री ८ वाजल्यापासून ते सकाळी ७ वाजेपर्यंत उद्याने आणि चौपाट्यांसह सर्व सार्वजनिक स्थळे बंद राहतील.
● मास्कशिवाय फिरणाऱ्या व्यक्तीला ५०० रुपये दंड तर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १००० रुपये दंड आकारला जाणार आहे.
● आज रात्री ८ वाजल्यापासून ते सकाळी ७ वाजेपर्यंत सर्व सिनेमा हॉल, मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रिन्स बंद ठेवण्यात येणार आहेत.
● होम डिलिव्हरी आणि हॉटेलच्या वेळेलाही या नियमांचे बंधन असणार आहे. मात्र, होम डिलिव्हरी सुरू राहणार आहे.
● या नियमांचे हॉटेल, रेस्टॉरंट, सिनेमागृह किंवा मल्टिप्लेक्सच्या मालकांनी उल्लंघन केल्यास ही सर्व स्थळे कोरोना संकट संपेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.

