Pune City News
पुणे कॅंटोन्मेंटपुणे शहर

आग आटोक्यात आणल्यानंतर घरी जात असताना अधिकाऱ्याचा मृत्यू

पुणे शहरातील कॅम्प परिसरात फॅशन स्ट्रीटला लागली होती. अग्निशामक दलाचे आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र अग्नि शामक दलाच्या एका कर्मचाऱ्याचा बसने धडक दिल्याने मृत्यू झाला आहे.

आग आटोक्यात आणल्यानंतर घरी जात असताना हा अपघात झाला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. प्रकाश हसबे असे त्या अधिकाऱ्याचे नाव आहे. पुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या अग्निशमन दलाचे ते प्रमुख होते.

शुक्रवारी (दि.२६ ) रोनी रात्री ‘फॅशन स्ट्रीट’च्या मार्केटला आग लागली. या परिसरात मोठ्या प्रमाणात कपड्यांची दुकाने असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते.

आग लागल्याची माहिती मिळताच पुणे महानगरपालिका आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी पोहचले. हा भाग अत्यंत दाटीवाटीचा परिसर आहे.

आग आटोक्यात आणल्यानंतर प्रकाश हसबे घरी निघाले होते. घरी जात असताना येरवाड्याजवळ एका बसने त्यांना धडक दिली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

Related posts

पुणे शहरात १५० पॉझिटिव्ह रुग्ण

Vishal Khandagale

आज शहरात 4103 पॉझिटिव्ह रुग्ण

Vishal Khandagale

पुण्यात निवडणुकीपूर्वी प्रचंड राजकीय घोळ : उमेदवारी, जागावाटप आणि पक्षांतर्गत अस्वस्थता

Reporter pune

Leave a Comment