कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेला ‘अनलॉक- ३’ चा टप्पा 30 ऑगस्टला संपत आहे. केंद्र सरकारकडून 30 सप्टेंबपासून अनलॉक- 4 टप्पा सुरु होईल, अशी घोषणा करण्यात आली आहे.
दरम्यान केंद्र सरकारकडून घोषणा झाल्यानतंर राज्य सरकारच्या नियमावलीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यानुसार राज्य सरकारने निमयावली जाहीर केली असून 30 सप्टेंबरपर्यंत निर्बंध कायम राहणार असल्याचं सांगितलं आहे.
राज्य सरकारने नियमावली जाहीर करताना ई-पासची अट रद्द केली आहे. यामळे आंतरराज्य प्रवास करण्यावरील बंधनं शिथील झाली आहेत.
यामुळे प्रवास करताना आता ई-पासची गरज नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे. याशिवाय खासगी तसंच मिनी बसेसना परवानगी देण्यात आली आहे.
हॉटेल पूर्णपणे सुरु होण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारने शाळा, कॉलेज तसंच शैक्षणिक संस्था 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचं सांगितलं आहे.
याशिवाय चित्रपटगृह, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, बार, सभागृह यांच्यावरही बंधनं कायम आहेत.
कोणत्या गोष्टी सुरु आणि काय बंद राहणार आहे.
● शाळा, कॉलेज तसंच शैक्षणिक संस्था 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार
● चित्रपटगृह, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, बार, सभागृह यांच्यावरही बंधनं कायम
● आंतरराष्ट्रीय प्रवासाला बंदी, केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी दिली असेल तर मुभा
● मेट्रो बंदच राहणार
● सामाजिक, राजकीय, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांवर बंदी कायम
● हॉटेल आणि लॉज यांना 100 टक्के क्षमतेने सुरु करण्यास परवानगी
● खासगी कार्यालय क्षमतेच्या 30 टक्के कर्मचाऱ्यांसोबत काम सुरु करु शकतात
● प्रवासी तसंच मालाच्या आंतरराज्य प्रवासासाठी ई-पासची अट रद्द. प्रवासासाठी परवानगीची आवश्यकता नाही.
● खासगी बस, मिनी बस तसंच इतर ऑपरेटर्सना परवानगी

