Pune City News
महाराष्ट्र

भाजपतर्फे आजपासून ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन

PUNE CITY NEWS :-राज्यातील महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी मंगळवारपासून राज्यभर ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन सुरू करण्यात येणार आहे,
अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी सोमवारी भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जाहीर केले.
महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी मंगळवारी भाजपचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी मुख्यमंत्री तसेच राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी व तहसीलदारांना भेटून निवेदन देणार आहेत. तर 22 मे रोजी लाखो कार्यकर्ते आपल्या घराबाहेर हातात फलक घेऊन उभे राहतील व राज्य सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध करतील.
इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यानेही रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूर,कामगार व श्रमिकांसाठी स्वतंत्रपणे पॅकेज जाहीर करावे, ही पक्षाची प्रमुख मागणी आहे.

Related posts

“मला राज्यसभेची अपेक्षाच नव्हती” एकनाथ खडसे

Vishal Khandagale

अत्यावश्यक सेवेसाठी लोकल सुरु करा : मंत्री अनिल परब

Vishal Khandagale

कोपर्डीतील निर्भयाचे आई-वडील उपोषणच्या तयारीत

Vishal Khandagale

Leave a Comment