कोरोनामहाराष्ट्र

महाराष्ट्रात 23 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण !

मुंबईत 24 तासांत पाच पोलिसांना कोरोना विषाणू ची लागण झाल्यामुळे कोरोनाबाधित पोलिसांची संख्या 15 वर गेली आहे.महाराष्ट्रत 23 पोलिसांना (सात अधिकारी व 16 कर्मचारी) कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 65 टक्के पोलिस मुंबईतील आहेत.मुंबई पोलिस दलाचे प्रवक्ते प्रणय अशोक यांनी कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येला दुजोरा दिला; मात्र अधिक माहिती देणे टाळले.

एकूण 15 पोलिस वसाहतींवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून, आतापर्यंत सहा पोलिस वसाहती सील करण्यात आल्या आहेत.विशेष लक्ष असलेल्या पोलिस वसाहतींमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची दिवसाआड वैद्यकीय तपासणी केली जात आहे. लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींवर तत्काळ उपचार करण्यात येत आहेत.सर्व पोलिस वसाहतींचे दरवाजे बंद करण्यात आले असून, येणाऱ्या-जाणाऱ्यांची कसून तपासणी सुरू आहे.

Related posts

पुणे शहर भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली विभागीय आयुक्तांची भेट

Vishal Khandagale

वानखेडे स्टेडियमवर पाचशे बेडची जम्बो फॅसिलिटी

Vishal Khandagale

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे : राज्यातील जनतेशी संवाद!

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX