Pune City News:- मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने एक बातमी आपल्या चाहत्याना दिली आहे.तिने आपला स्वत:चा साखरपुडा झाल्याचे आपल्या सोशल मिडीयावरून जाहीर केले आहे.
प्रसिध्द उद्योगपती कुणाल बोनोडेकर याच्याशी तिचा साखरपुडा झाल्याचं सांगितलं आहे.घरातल्या सगळ्या लोकांशी उपस्थित हा सोहळा दुबाई येथे पार पडला. फेब्रुवारी महिन्यात तिने एक फोटो शेअर करत एका नव्या आयुष्याला सुरूवात करतीये, असं म्हटलं होतं. 2 फेब्रुवारी 2020 रोजी हा साखरपुडा झाल्याचे तिने सांगितले आहे.
सोनाली आपल्या फेसबुकवरून सांगितले आहे की, आमचा 2 फेब्रुवारीला साखरपुडा झाला आहे. आमचा हा आनंद तुम्हा सगळ्यांसोबत वाटण्यासाठी आजच्या पेक्षा योग्य दिवस असूच शकत नाही असं मला वाटते. असेही तिने म्हटले आहे.

