आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

भाजपाच्या मुळेच पुण्यात कोरोनाचे थैमान आणि पुणेकरांचे हाल! -शिवसेना

पुणे शहर – फेब्रुवारीच्या अखेरीस द्यायला हव्या होत्या त्या सुविधा मार्च च्या अखेरीस देणाऱ्या पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपाला कोरोनाच्या थैमानाला रोखण्यात अपयश आले असून त्यांच्या विलंबकारी निष्काळजीपणामुळे पुणेकरांचे अतोनात हाल झाल्याचा आरोप शिवसेनेने आज केला आहे . आज महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि अतिरिक्त आयुक्त रुबल आगरवाल यांची शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली आणि विविध मागण्या केल्या . शहरप्रमुख संजय मोरे,गटनेते पृथ्वीराज सुतार , विशाल धनवडे, बाळासाहेब ओसवाल ,शाम देशपांडे ,प्रशांत बधे,संजय भोसले, अशोक हरणावळ, अभय वाघमारे, प्रविण डोंगरे, राहुल जेकटे, युवराज पारिख आदीचा या शिष्टमंडळात समावेश होता.

या वेळी शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले :-

पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये सध्या कोरोना संक्रमणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. रोज ४०००  पर्यंत कोरोना रूग्ण संक्रमित होत आहेत. तसेच रुग्णांचा मृत्यूदर देखील ३०  ते ४० च्या दरम्यान झाला आहे. पुणे शहरामध्ये कोरोना रुग्णांना उपचार मिळणे अवघड झाले आहे, त्यामुळे कोरोना रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. कोरोना रुग्णांना ICU बेड मिळत नाहीत, तसेच व्हेंटिलेटर बेड देखील उपलब्ध होत नाहीत त्यामुळे कोरोना संक्रमित रुग्णांचे मृत्यु प्रमाण वाढत आहे.

सध्याच्या वाढत्या महागाईच्या काळात सर्वसामान्य पुणेकर नागरिकांना खाजगी रूग्णालया मध्ये उपचार घेणे त्यांच्या आवाक्याबाहेर झाले आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेने महापालिकेच्या अंतर्गत असलेल्या सर्व रूग्णालयामध्ये कोरोना संक्रमित रुग्णांचे उपचार सुरू करणे आवश्यक आहे. अशामुळे गोरगरीब व सर्व सामान्य पुणेकर नागरिकांना कोरोना संक्रमणात उपचार मोफत मिळतील. पुणे महानगरपालिकेच्या रूग्णालयामध्ये कोरोना बाधित रूग्णांना लागणारी औषधे २४ तास मोफत देण्यात यावी. व प्रत्येक रूग्णालयात डाॅक्टरांची टीम २४  तास उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच जंबो कोविड सेंटर हे मागील वर्षीप्रमाणे सुसज्जरीत्या संपूर्ण डाॅक्टरांच्या टीमसहित सुरू करणे आवश्यक असताना तुटपुंज्या सुविधा व साधनामुग्रीने जम्बो कोविड सेंटर सुरू आहे.महापौर व पुणे मनपाने कोरोना रूग्णांना बेड उपलब्ध होण्यासाठी जे पाच फोन नंबर जाहीर केले आहेत ते नंबर कधीच लागत नाहीत अशा अनेक तक्रारी पुणेकर नागरीक करीत आहेत. त्यामुळे बेड मिळणे अवघड झाले आहे.सत्ताधारी भाजप पुणेकरांची फसवणूक करून त्यांच्या जीवाशी खेळत आहेत. पुणेकरांच्या पैशातून फक्त जाहिराती व पोपटपंची चालू आहे. पुणे महानगरपालिकेने पुणे शहरातील प्रत्येक भागामध्ये पुर्वीप्रमाणे विलगीकरण कक्ष सुरू करावे त्यामुळे कोरोना संक्रमित रुग्णांकडून इतर नागरिकांना कोरोनाचे संक्रमण होणार नाही. त्यामुळे नवीन कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होईल.

Related posts

कोरोना : ससून हॉस्पिटलच्या नवीन इमारतीची विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर व जिल्हाधिकारी श्री.राम यांनी केली पाहणी

Vishal Khandagale

Pune City Corona Update

Vishal Khandagale

संपूर्ण तालुका क्वारंटाईन(विलींगीकरण)!

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX