Pune City News
कसबाकोथरूडखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

काँग्रेस भवनमध्ये “प्रतीकात्मक होळी”

पुणे शहर – शेतकरी बचाव संयुक्त कृती समिती तर्फे ” गोदी १९ विषाणू ” यांची प्रतीकात्मक होळी दहन काँग्रेस भवन येथे करण्यात आली.

मोदी सरकार २०१४ मध्ये आणि पुन्हा एकदा २०१९ मध्ये सत्तेत आल्यापासून त्यांनी जे रागरंग दाखवले आहेत; त्याने आता देशातील प्रत्येक नागरिक वैतागला आहे.

एकापाठोपाठ एक जनताविरोधी निर्णय घेत – जनतेची दिशाभूल करत – धनदांडग्यांच्या – कंपन्यांच्या नफ्यासाठी BSNL, LIC, रेल्वे, एअरपोर्ट विकण्याचा सपाटा लावला आहे. “हम दो, हमारे दो” याप्रमाणे केंद्र सरकार चालविले जात आहे.
याबरोबरच जीएसटी-नोटबंदीने सामान्यांचे कंबरडे तर मोडलेच आहे, गॅस-डिझेल-पेट्रोलच्या दरवाढीने तर सर्वसामान्य माणसाचे जगणे कठीण केले आहे.
नवीन शेती आणि शेतकरीविरोधी कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांपासून सामान्य माणूस देशोधडीला लागेल. सोबतचं नवीन कामगार कायद्यांमुळे कामगार हा गुलाम बनेल. अश्या परिस्थितीत भाजपाच्या गोदी-१९ विषाणूचे देशावर आलेले हे संकट लवकरात लवकर जावे ही मागणी करत आणि “क्या हुआ तेरा वादा”, ‘गेल साठवलेल गाठुड बया केले पब्लिकच तर वाटोळे बया” हे गीत गात कॉंग्रेस भवन येथे होळी साजरी करण्यात आली.
या सर्वांची  प्रतीकात्मक पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष रमेश बागवे यांच्या हस्ते  होळी दहन करण्यात आली. या प्रसंगी अभय छाजेड, मोहन जोशी, कमल व्यवहारे, नीता रजपूत, अशोक राठी, नीरज जैन व लोकायत कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts

पूरबाधितांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी समूह विकास, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती द्यावी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Vishal Khandagale

पुणे शहरांतील कोरोना रुग्णांची आजची आकडेवारी पहा !

Vishal Khandagale

शहरात २४ तासात वेगवेगळ्या ठिकाणी तीन जणांची आत्महत्या

Vishal Khandagale

Leave a Comment