Pune City News
कोरोनापुणे

पुणे शहरात आज तब्बल १९४ रुग्ण झाले बरे ; १०८ नवीन रूग्णांची वाढ !

PUNE CITY NEWS

PUNE CITY NEWS:- शहरातील कोरोनाग्रस्त रूग्णांचा एकूण आकडा ६ हजार २०१ वर जाऊन पोहचला असून शनिवारी दिवसभरात १०८ रूग्णांची नोंद करण्यात आली. आज दिवसभरात बरे झालेल्या १९४ जणांना घरी सोडण्यात आले आहे.विविध रुग्णालयातील १७० रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ०८ रुग्णांचा मृत्यू झाला असून प्रत्यक्षात अ‍ॅक्टिव्ह रुग्ण २ हजार २४८ झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.शनिवारी रात्री आठपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या १०८ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात १०, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये ४४ तर खासगी रुग्णालयांमध्ये ५४ रुग्ण दाखल झाले आहेत.उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १७० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४३ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १२७ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत.

Related posts

मनसेचा मेळावा रद्द

Vishal Khandagale

जि.प.शाळा देणार ऑनलाइन शिक्षण

Vishal Khandagale

कोरोना विषाणू बाबत आयुक्तांनी घेतला आढावा !

Vishal Khandagale

Leave a Comment