Pune City News
पिपरी चिंचवडमहाराष्ट्रराष्ट्रीय

युवकाला फेकले 11 व्या मजल्यावरून

पैशावरुन झालेल्या वादातून एका युवकाला 11 मजल्यावरुन ढकलून दिल्याची धक्कादायक घटना पुण्यातील कोंढवा परिसरात घडली आहे.
या प्रकरणात कोंढवा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर चिलवेरी (वय 24) असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोंढवा परिसरातील खडी मशीन चौकातील पूल हौंसिग या इमारतीतील 11 व्या मजल्यावर चिलवेरी कुटुंब राहतात.
आरोपीकडून 10 टक्के व्याजाने पैसे घेतले होते. आरोपी पैसे मागण्यासाठी चिलवेरी यांच्या घरी आला होता. पैशावरुन दोघांमध्ये वाद सुरू झाला.
या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. यावेळी आरोपीसोबत आणखी दोघेजण होते. यावेळी पैसे न दिल्याच्या रागात आरोपींनी चिलवेरीला 11 व्या मजल्यावरुन ढकलून दिले.
यामध्ये सागरचा मृत्यू झाला. या प्रकरणात कोंढवा पोलिसांकड़ून पुढील तपास केला जात आहे. या प्रकरणात कोंढवा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

Related posts

एक देश एक रेशन कार्ड’ योजना सुरु!

Vishal Khandagale

विदर्भ, मध्य महाराष्ट्र, कोकणाला पावसाचा इशारा

Vishal Khandagale

पुणेशहरात “संचारबंदी” प्रस्ताव दाखल

Vishal Khandagale

Leave a Comment