महाराष्ट्राच्या भीमा-कोरेगावमध्ये 2018 मध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) मोठी कारवाई केली आहे.
- सामाजिक कार्यकर्ते 83 वर्षीय फादर स्टॅन स्वामी यांना झारखंडमधून अटक केली आहे.
- भीमा-कोरेगाव प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एनआयएच्या टीमने गुरुवारी रात्री फादर स्टेन स्वामी यांना नामकुम स्टेशन हद्दीत येणाऱ्या बगईंचा स्थित त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतले.
- जवळपास 20 मिनिटे चौकशी केल्यानंतर स्वामी यांना अटक केली. स्वामी यांना शुक्रवारी एनआयए न्यायालयासमोर हजर करण्याची शक्यता आहे.
- फादर स्टेन स्वामी यांना रिमांडवर घेतले जाऊ शकते किंवा ट्रान्झिट रिमांडवर त्यांना दिल्लीला आणले जाऊ शकते.
- मिळालेली माहिती भीमा-कोरेगाव प्रकरणी त्यांना अटक केली असून ते मूळचे केरळचे रहिवासी आहेत.
- याआधीही स्वामींची एनआयएकडून चौकशी केली होती. माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून त्यांची चौकशी केली होती.

