Pune City News
महाराष्ट्र

मॉल आणि व्यापारी संकुले सुरू करण्यास परवानगी द्या!

PUNE CITY NEWS :- देशातील असंख्य दुकानदारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘रिटेलर असोसिएशन ऑफ इंडिया’च्या एका शिष्टमंडळाने पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन राज्यातील मॉल आणि व्यापारी संकुले सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी केली.

व्यापारी संकुले आणि मॉल्स अत्यंत काळजीपूर्वक व नियोजनबद्ध पद्धतीने कसे उघडता येतील, या मुद्दय़ावर शिष्टमंडळाने आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा केली.

पर्यटनमंत्री आदित्यठाकरे यांनी असोसिएशनच्या मागण्या रास्त असल्याचे मत व्यक्त केले.

सामाजिक अंतराचे निर्बंध कसोशीने पाळण्याची तयारी दाखवत सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत मॉल सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती संघटनेकडून करण्यात आली.

सध्याच्या काळात मागणीतली अस्थिरता पाहता दुकाने अधिक काळ व आठवडय़ाचे सर्व दिवस सुरू ठेवण्यात यावीत, अशीही रिटेलर असोसिएशनची आग्रही भूमिका आहे.

Related posts

गृहमंत्र्यांचा थेट अमित शहांना सवाल

Vishal Khandagale

दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्यावर गुन्हा दाखल करा… – संभाजी ब्रिगेड

Vishal Khandagale

न्यूज अँकर रोहित सरदाना यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन; कोरोनाचीही झाली होती लागण

Vishal Khandagale

Leave a Comment