पुणे

राष्ट्रवादी पक्षाची भुमिका व सरकारी योजना सर्वसामान्य जनते पोहचवा- शहराध्यक्ष विजय बापु डाकले

राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभाग पुणे शहराची आठ मतदार संघाचे अध्यक्ष आणि शहर कार्यकारणीची महत्वपुर्ण बैठक आज पक्ष कार्यालयामध्ये पार पडली . आठही मतदार संघामध्ये पक्ष संघटना बळकट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम करा, केंद्रात मोदी यांचे सरकार आल्या पासुन देशभर महिला आणि दलित यांचेवरील अन्याय , अत्याचार , बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे हे संपर्कातील जनतेला सांगा याकरीता सोशल मिडीयाचा प्रभावी वापर करा, आपल्या पक्षाची भुमिका, सरकारी योजना सर्वसामान्य जनतेपुढे पोहचवा असे

यावेळी सामाजिक न्यायचे शहराध्यक्ष विजय बापु डाकले यांनी कार्यकर्त्यांना आपल्या मनोगतामधे सांगितले. या बैठकीमध्ये संजु किसन भापकर अध्यक्ष पर्वती मतदार संघ,नीलम विशाल शिंदे महिला अध्यक्ष कॉन्टेमेंट मतदार संघ , सुदाम भिकाजी चांदणे सरचिटणीस पुणे शहर , बलभीम एकनाथ खंडागळे संघटक सचिव कसबा मतदार संघ, संदीप शशिकांत काळे वरिष्ठ उपाध्यक्ष पुणे शहर , धनराज यादव कांबळे संघटक सचिव पर्वती मतदार संघ यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी वैजनाथ वाघमारे, शंकर तेलंगे, संतोष बेंद्रे, संदिप गाडे, विजय बगाडे, लहु कांबळे, दयानंद जाधव, अक्षय ढावरे, सचिन डाकले, व इतर पदाधिकारी हजर होते.

Related posts

सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींची स्मार्ट सिटी कमांड सेंटर येथे आयुक्तांशी चर्चा !

Vishal Khandagale

प्लाझ्मा दान करण्यासाठी पुणेकरांनी पुढे यावे’- महापौर मुरलीधर मोहोळ

Vishal Khandagale

“11 मजल्यावरून फेकून”सावकारकीतून असा झाला खून…

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX