पुणे

सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींची स्मार्ट सिटी कमांड सेंटर येथे आयुक्तांशी चर्चा !

Pune City News:- पुणे शहरातील करोना विषाणू प्रादुर्भाव संबंधी कार्यवाहीचे नियोजनाबाबत माहिती घेण्यासाठी विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी आज गुरुवारी स्मार्ट सिटी कमांड सेंटर येथील करोना वॉर रूमला भेट देऊन महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

राज्यसभा सदस्य वंदना चव्हाण, माजी महापौर अंकुश काकडे, आमदार चेतन तुपे, आमदार सुनील टिंगरे, माजी महापौर दत्ता धनकवडे, महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ, पृथ्वीराज सुतार, अरविंद शिंदे, वसंत मोरे व महापालिका व स्मार्ट सिटीचे अधिकारी यावेळी उपस्थित होते

लोकप्रतिनिधींनी केल्या विविध सूचना

– रुग्णालयांमध्ये महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था करावी.
– वॉर्डनिहाय मनुष्यबळ नियोजन वाढवावे.
– रुग्णांच्या विलगीकरणासाठी काही पदाधिकारी, संस्था सेवाभावी वृत्तीने काम करत आहेत. त्यांच्याशी समन्वय ठेवणे.
– विलगीकरणासाठी काही हॉटेल अधिकृत करणे
– नायडू रुग्णालयात निवास व्यवस्था करावी.
– प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील भाग काही अंशी सक्रिय होत आहे. आता घरकाम करणारे लोकांचाही विचार व्हावा.
– आतापर्यंत सुमारे ७०,००० घरांना रेशन किट देण्यात आले आहे. आणखी काही देण्यात येतील.
– यादीनुसार मदतीची कार्यवाही करावी. तसेच धर्मादाय संस्थांसोबत बैठका घेऊन मदत घ्यावी अशा सूचना अंकुश काकडे व अरविंद शिंदे यांनी केल्या.
– प्रत्येक नगरसेवकाच्या अंतर्गत असलेल्या रुग्णवाहिकांचा उपयोग करण्यात यावा असे अरविंद शिंदे यांनी सांगितले.
– कर आकारणीवर शास्ती लावू नये. जप्ती आणि शास्तीची कार्यवाही एक दोन महिने पुढे ढकलावी.
– सुमारे ७५००० स्थलांतरित व्यक्तींची यादी तयार केली असून, त्यांच्या परतीच्या प्रवासाला लवकरच सुरुवात केली जाईल. त्यानंतर शेल्टर हाऊसमधील नागरिकांची संख्या कमी होईल.

Related posts

देशातील प्रवासी रेल्वे सेवा बंद !

Vishal Khandagale

कोरोना : बंदचा निर्णय 31 मार्च नव्हे, पुढील आदेशापर्यंत: उपमुख्यमंत्री अजित पवार

Vishal Khandagale

गोखले कन्स्ट्रक्शन्सच्या वतीने महापालिकेला निर्जंतुकीकरण कक्ष भेट !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX