गुन्हे विषयकपुणे

सांगवी येथे पत्नीच्या प्रियकराचा भरदिवसा खून

crime

पुण्यातील सांगवी परिसरात लग्नापूर्वीपासून पत्नीधी असलेल्या प्रेम संबंधातून पत्नीच्या नवऱ्याने प्रियकराचा भर दिवसा कोयत्याने वर करून खून केल्याची घटना घडली आहे.

हल्ला केल्यानंतर आरोपी घटना स्थळावरून फरार झाला आहे. सौरभ व्यंकट जाधव (वय २८) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत सांगवी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपीच्या पत्नीचे लग्नापूर्वी सौरभ याच्याशी प्रेमसंबंध होते. या रागातून आरोपीने पत्नीच्या प्रियकरावर रविवारी( दि.१३) रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास साथीदाराच्या मदतीने सांगवीतील जिल्हा रुग्णालयाच्या आवारात कोयत्याने वार केले.

भरदिवसा ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. गंभीर जखमी झाल्याने सौरभ याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून फरारी आरोपींचा शोध सुरु असून सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

याप्रकरणी मृताचा भाऊ सुशांत जाधव रा.संजयनगर ,औंध यांनी फिर्याद दिली आहे.

Related posts

“विजयस्तंभास अभिवादन” जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी घेतला नियोजनाचा आढावा

Vishal Khandagale

महापालिकेच्या सभागृह नेतेपदी गणेश बिडकर यांची नियुक्ती !

Vishal Khandagale

बुधवार पेठेत तडीपार गुंडाने केला पोलीस हवालदाराचा खून

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX