Pune City News
पिपरी चिंचवडपुणे

कोरोना विषाणू बाबत आयुक्तांनी घेतला आढावा !

Pune City News:- पुण्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आलेख कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली महसूल, आरोग्य विभाग, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली.

बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, ससून हॉस्पिटलचे समन्वयक राजेंद्र गोळे आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. म्हैसेकर म्हणाले, विभागात पुणे जिल्ह्यातील वाढती रुग्ण संख्या ही चिंतेची बाब आहे. रुग्णांच्या संख्येत घट होण्यासाठी प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत. कोरोना पोसिटिव्ह रुग्ण आढळलेल्या जास्त घनसंख्या असणाऱ्या भागात लॉक डाऊन ची कडकपणे अंमलबजावणी करावी.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील आजवरच्या कोरोना रुग्णांची पार्श्वभूमी, त्यांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवा-सुविधा, पीपीई किट, मास्क, औषध साठा, ससून रुग्णालयाला आवश्यक वैद्यकीय साधनसामुग्री, कामगारांचे निवारा कॅम्प व त्यांची भोजन व्यवस्था, रेशन धान्य वितरण, अत्यावश्यक सेवा सुविधांमधील व्यक्तींना देण्यात येणारे पासेस आदी विविध बाबींचा आढावा घेतला.

Related posts

पेशव्यांच्या टांकसाळीच्या जागेतील गोपालकृष्ण मंदिराचा होणार जीर्णोद्धार 

Vishal Khandagale

महानगरपालिकेकडून स्वच्छता पंधरवड्याला सुरुवात

Vishal Khandagale

पिंपरीत भीषण अपघात !

Vishal Khandagale

Leave a Comment