Pune City News
कोरोनापुणे

सुवर्णयुग मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने आंबेडकर जयंती निमीत्त जीवनावश्यक वस्तू चे वाटप!

Pune City News:-कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव देशभरात दिवसेंदिवस वाढतच असल्यामुळे टाळेबंद(लॉकडाऊन) च्या काळात हातावर पोट असणारया लोकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सुवर्णयुग मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने रामवाडी , विमाननगर व नगररोड येथील गोरगरीब व गरजू नागरिकांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आल्या. जयंती निमित्त दरवर्षी होणारी मिरवणूक व सांस्कृतिक कार्यक्रम ह्या वर्षी रद्द करण्यात आले त्यामुळे ट्रस्टच्या वतीने सामाजीक भान राखत कर्तव्य पार पाडत गोरगरिबांना ट्रस्टच्या एक-एक कार्यकर्त्यां ने प्रत्येक विभागातील घरोघरी जाऊन घरपोच रेशन वाटप केले.

तसेच या आपत्कालीन परिस्थतीत गोरगरीब व गरजुंना सढळ हाताने मदत करून आपले कर्तव्य पार पाडण्याचे आव्हान ट्रस्ट च्या वतीने करण्यात आले.

यावेळी वाटपच्या कार्यक्रमाचे आयोजक व मंडळाचे मार्गदर्शक प्रदीप रोकडे, विशाल खंडागळे, ट्रस्ट चे अध्यक्ष अभिजीत रोकडे, उपाध्यक्ष शेवराव यादव, खजिनदार विपीन खंडागळे, किशोर डोळस, समीर शेख, प्रदीप शिंदे, राजू लोखंडे, प्रवीण साबळे, दीपक चव्हाण, संतोष आल्हाट.सुरज डोळस, जाफर शेख, रवींद्र ठोकळ, शानवाज शेख, राकेश भिल्लारे,रुद्र वारे,स्वप्नील पवार, निखिल ससाणे व इत्यादीनी परिश्रम घेतले.

Related posts

पुणे शहरात CRPF दाखल…

Vishal Khandagale

पुणे शहरातील क्षेत्रीय कार्यालय नुसार कोरोनाच्या सद्यपरिस्थिती चा नकाशा…..

Vishal Khandagale

अनुसूचित जातीच्या उमेदवारांना स्टार्ट-अपसाठी प्रशिक्षण

Vishal Khandagale

Leave a Comment