Pune City News
पिपरी चिंचवडपुणे

सिम्बॉयोसिस रुग्णालयातही आता कोरोनावर उपचार!

Pune City News:- ‘कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेने आणखी वेगाने पावले उचलायला सुरुवात केली असून सिम्बॉयोसिस विद्यापीठासोबत महापालिकेने करार केला आहे. यामुळे कोरोनावरील उपचारासाठी आवश्यक असलेले विलगीकरणाचे ५०० आणि अतिदक्षताचे ३० बेड्स उपलब्ध झाले आहेत’, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

पुणे महापालिका आणि सिम्बॉयोसिस विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झाला असून लवळे येथील सिम्बॉयोसिस हॉस्पिटल आता महापालिका कोरोना उपचारांसाठी वापरणार आहे. महापालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाची यंत्रणा कमी पडल्यानंतर सिम्बॉयोसिस रुग्णालयात कोरोनाबाधितांना भर्ती केले जाणार आहे.

या संदर्भात बोलताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘शहरात कोरोनाबाधितांची संख्या सद्यस्थितीत नियंत्रणात असली तरी भविष्यातील धोके आणि इतर देशात आलेले अनुभव लक्षात घेता हे पाऊल उचलले आहे. या रुग्णांवर होणाऱ्या उपचारांचा खर्च महात्मा ज्योतिबा फुले योजनेतून केला जाणार आहे. शिवाय जे रुग्ण या योजनेला पात्र झाले नाही तर महापालिका संबंधित रुग्णाचा खर्च सीजीएचएस दराप्रमाणे अदा करणार आहे.

Related posts

महापालिका करणार खासगी प्रयोगशाळांसोबत करार

Vishal Khandagale

कोरोना: जेनिफर…. तुझ्या या धाडसाला जगाचा सलाम !!

Vishal Khandagale

सारथी” बंद करण्याचा डाव- संभाजी ब्रिगेड

Vishal Khandagale

Leave a Comment