Pune City News
कोरोनापुणे

लॉकडाऊन (टाळेबंदी) मध्ये पोदार शाळेच्या विद्यार्थ्यासाठी उपयोगी ठरतोय “ऑनलाइन अभ्यासक्रम !

Pune City News:- शहरी व ग्रामीण भागातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये वी ९ वी व ११ रावीचा अभ्यासक्रम संपत आला असतानाच कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाले. त्यामुळे उर्वरित अभ्यासक्रम पूर्ण कसा करायचा, हे आव्हान शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांसमोर होते.वर्षभरात कधीतरी वेगळा प्रयोग म्हणून यापूर्वी वापरण्यात येणारी ऑनलाइन शिक्षण प्रणालीच आता मुख्य प्रणाली बनू पाहात आहे. सुरूवातीला वापरायला किचकट वाटणारे हे तंत्रज्ञान आता कोरोनामुळे दूर गेलेल्या शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधील दुवा ठरत आहे, अशा शब्दात शिक्षक आपले अनुभव सांगत आहेत. परंतु शहर असो वा ग्रामीण भागात इंटरनेट यंत्रणेत सातत्याने येणाऱ्या अडचणी आणि विविध ऍपमध्ये असणारा सुरक्षिततेचा अभाव यामुळे “स्टडी फ्रॉम होम’मध्ये झूम, सिस्को ,वेबेक्स ,आणि गुगल क्लास रूम , असा सोशल मीडियाचा वापर अधिक करत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
परंतु फारसे टेक्‍नोसॅव्ही नसलेल्या शिक्षकांनी देखील अवघ्या काही दिवसात तंत्रज्ञान अवगत केले. त्यानंतर महाविद्यालयांतर्फे विद्यार्थी व शिक्षकांचे ऑनलाइन वर्ग सुरू झाले. ९ वी व ११ रावीचा अभ्यासक्रम संपवून आता ही शाळा व महाविद्यालये दहावी व बारावीच्या तयारीला लागली आहेत.
बहुतांश मुला व मुलींकडे ऍपची सोय उपलब्ध नाही. त्यामुळे आम्ही झूम, सिस्को, वेबेएक्स आणि गुगल क्लास रूम आशा
अशा सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत आहोत. त्याद्वारे शिक्षक पीडीएफ, छोटे व्हिडिओ आणि ऑडिओ व्हॉट्‌स ऍपवर पाठवत आहेत. परंतु ऑनलाइन शिक्षण अधिक चांगले होण्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे.

शहनाज कोटार, मुख्याध्यापिका (चिंचवड पुणे)

कोरोनामुळे शाळा, महाविद्यालय सगळ्यात आधी बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे उर्वरित अभ्यासक्रम कसा पूर्ण करायचा, असा प्रश्न होता. परंतु उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवले आहे. ९ वी व ११ रावीचा अभ्यासक्रम पूर्ण करून आता आम्ही दहावी व बारावीची तयारी देखील सुरू केली आहे.

मिनल वैद्य, मुख्याध्यापिका, (शिरूर) .

लॉकडाउनमुळे अपूर्ण राहिलेला ९ वि व ११ रावीचा अभ्यासक्रम आता पूर्ण केला असून बारावीची तयारी सध्या सूरू आहे. परंतु विज्ञान शाखेची प्रात्यक्षिके ऑनलाइनद्वारे शक्‍य होत नाही. ऑनलाइन वर्गात जवळपास 60ते 70 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती असते.

एस.कौर, मुख्याध्यापिका (चाकण)

शाळा व महाविद्यालयाला सुट्टी दिल्यानंतर आता अभ्यासाचे पुढे काय होणार असा प्रश्न पडला होता. परंतु झूम, सिस्को, वेबेक आणि गुगल क्लास रूम ऍपचा वापर करून पुन्हा अभ्यासाला सुरवात झाली आहे. वर्गापेक्षा या ऑनलाईन वर्गात शिक्षकांचे अधिक वैयक्तिक लक्ष असल्याचे जाणवते. या वर्गात प्रश्न विचारणे, शंकांचे निरसन करणे याचे प्रमाण वाढले आहे.
ऑनलाइन शिक्षणातील प्राधान्यक्रम :
– झूम, वेबेनॉर , सिस्को, गुगल क्लास रूमअसे व्हीडीओ कॉन्फरन्सेस ऍप
– व्हाट्‌सएप, ई-मेलद्वारे पीडीएफ, ऑडियो, व्हिडिओ, पीपीटी, वर्क शीट पाठविणे
– यु ट्यूब चॅनल .
या कौशल्यांची आहे गरज
– ऑनलाइन शैक्षणिक साहित्याची निर्मिती
– व्हिडिओ, ऑडिओ, पीपीटी बनविणे
– शैक्षणिक तंत्रज्ञान वापरणे
– शिक्षक, विद्यार्थी, पालक यांना प्रशिक्षण देणे
– आपल्या सोयीनुसार ऍप विकसित करणे

Related posts

रेस्टॉरंट व्यवसायिकांसाठी ‘काळा दिवस’ – रेस्टॉरंट असोसिएशन

Vishal Khandagale

खोटी माहिती देणाऱ्यांवर कारवाई करा: मुरलीधर मोहोळ

Vishal Khandagale

शहरात रेमडेसिव्हिरचा काळाबाजार त्वरित थांबवावा- राघवेंद्र मानकर

Vishal Khandagale

Leave a Comment