महाराष्ट्र

अखेर शिक्कामोर्तब ! मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी

मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठीची राजकीय रणधुमाळी लवकरच सुरू होणार असून याच पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नव्या नेत्याची नियुक्ती झाली आहे. काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार भाई जगताप यांची मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून खरंतर भाई जगताप यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. दरम्यान, आता पक्षाकडून याबाबतची अधिकृत घोषणा झाली असून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष म्हणून भाई जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे.

 

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर काहीच दिवसांपूर्वी भाजपने या निवडणुकीसाठी आमदार अतुल भातखळकर यांच्याकडे जबाबदारी सोपवलेली असताना दुसरीकडे काँग्रेसनेही हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दरम्यान, मुंबई काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्याबाबत पक्षांतर्गत वाढलेल्या नाराजीमुळे हा खांदेपालट करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

Related posts

राज्यातील मद्यालयांना रात्री दहापर्यंत परवानगी

Vishal Khandagale

राष्ट्रीय क्रमवारीत डी. वाय.पाटील दंत महाविद्यालयाला तिसरे स्थान…

Vishal Khandagale

एल्गार परिषदेला राज्य सरकारची परवानगी

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.