Pune City News
महाराष्ट्र

राज्यभरात वीज दरात मोठी कपात

Pune City News:- राज्य सरकारने वीज ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य वीज नियामक आयोगाने राज्य सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भार न पडू देता स्वस्तात वीज देण्याचं नियोजन केलं आहे.वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरगुती विजेच्या वापरात 5 ते 7 टक्के, व्यावसायिक दरात 10-12 टक्के आणि औद्योगिक दरात 10-11 टक्क्यांनी कपात करण्यात येणार आहे.

नवे दर 1 एप्रिल 2020 पासूनच लागू होणार असल्यामुळे ग्राहकांना पुढच्या बिलापासूनच दिलासा मिळणार आहे.वीज नियामक आयोगाच्या माहितीनुसार, मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्र या प्रमाणे वीज दरात कपात करण्यात आली आहे. मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्या आयोगाच्या आदेशानुसार दर कमी करतील. तर उर्वरित महाराष्ट्रासाठीचे दर महावितरणकडून कमी केले जातील.

Related posts

मराठा आरक्षणावरून सत्ताधारी – विरोधक आमनेसामने

पुणेशहरात “संचारबंदी” प्रस्ताव दाखल

Vishal Khandagale

कोरोना: 276 भारतीयांना कोरोनाची बाधा !

Vishal Khandagale

Leave a Comment