Pune City News
महाराष्ट्र

अभिनेता सुबोध भावेसह पत्नी, मुलाला कोरोनाची लागण

PUNE CITY NEWS :- मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव झाल्याची माहिती मिळाली आहे. अभिनेता सुबोध भावे यांनी स्वत: ट्वीट करून माहिती दिली आहे.

ट्वीट : ‘मी, मंजिरी आणि माझा मोठा मुलगा कान्हा आम्हा तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही घरीच स्वत:ला क्वारंटाईन करून घेतलं आहे.

https://twitter.com/subodhbhave/status/1300342083169837057

तज्ज्ञांच्या मार्गदर्शानं उपचार सुरू आहे. तुम्ही सगळे काळजी घ्या आणि घरी सुरक्षित रहा’ असं ट्वीट अभिनेता सुबोध भावेनं केलं आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये सुबोध भावे सोशल मीडियावर लहान मुलांसाठी कथा-गोष्टी ऑनलाइन स्वरुपात सांगत आहेत. ‘सुबोध दादाची गोष्ट’ लहान मुलांमध्ये खूप कमी वेळात प्रसिद्ध झाली. सुबोध भावे आणि त्यांचं कुटुंबीय कोरोनातून लवकर बरं व्हावे यासाठी लहानांपासून अनदी वयोवृद्धांपर्यंत त्यांचे चाहते देवाकडे प्रार्थना करत आहेत.

Related posts

राज्यापुढे मोठे संकट; रक्तसाठा घटला

Vishal Khandagale

राज्यात 31 मे पर्यंत लॉकडाउन कायम !

Vishal Khandagale

जीवनावश्यक वस्तू २४ तास उघडे : मुख्यमंत्री ठाकरे

Vishal Khandagale

Leave a Comment