राष्ट्रीय

भारत – चीन सैनिक पुन्हा एकमेकांना भिडले

भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये सीमेवर पुन्हा एकदा संघर्ष पाहायला मिळाला. पूर्व लडाख भागात पॅन्गाँग सरोवराजवळ दोन्ही देशांचे सैनिक २९-३० ऑगस्टच्या रात्री एकमेकांना भिडल्याचे समोर आले.

प्रयत्न : चीनी सैनिकांकडून या भागात घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रयत्न भारतीय सैनिकांनी हाणून पाडला.

करार तोडला : २९-३० ऑगस्टच्या रात्री चीनी सेनेच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या (PLA) जवानांनी शेवटच्या बैठकीत झालेला करारही तोडला आणि पूर्व लडाख भागात परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करताना घुसखोरीचा प्रयत्न केला.

माहिती : भारतीय जवानांनी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या जवानांचा हा प्रयत्न हाणून पाडला आणि पॅन्गाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावर चीनी सेनेची घुसखोरी रोखली, अशी माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आलीय.

फ्लॅग मीटिंग : भारताकडून या भागात सैनिकांची संख्या वाढवली. चीनच्या घुसखोरीच्या प्रयत्नानंतर पुन्हा एकदा चुशूलमध्ये ब्रिगेड कमांडर स्तरावार फ्लॅग मीटिंग सुरू आहे.

Related posts

भारत-चीन मधील तणाव वाढला

Vishal Khandagale

आयपीएल क्रिकेट स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली

Vishal Khandagale

घरपोच सेवेसाठी ई-कॉमर्स कंपन्या पुन्हा मैदानात

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX