Pune City News
Uncategorized

महापालिकेचा अधिकारी,खाजगी ठेकेदार ; फार्म हाऊसवर चक्क “डान्सबार” मध्ये मश्गूल!

पुणे शहर :- राज्यात व पुणे शहरांतील लॉकडाऊन १५ मे पर्यत वाढविण्यात आला असतानाही मुंबईहून नृत्यांगना (डान्सर )आणून उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फार्म हाऊसवर चक्क डान्स बार सुरु असल्याचे उघडकीस आले आहे . मध्यरात्री पोलिसांनी छापा टाकून महापालिकेतील रिंगमास्टर ठेकेदारांसह , ९ जणांना अटक केली आहे. या पार्टित 1 महापालिका एक अधिकारी सहभागी होता असे समजते आहे.या ठिकाणी वेश्याव्यवसायही सुरु असल्याचे निष्पन्न झाले असून ५ तरुणींची सुटका करण्यात आली आहे.

उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुडजे गावात लबडे फार्म हाऊसवर डी जेच्या तालावर तरुणींना नाचवत डान्सबार सुरु होता. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोणपे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमनगर पोलिसांनी बुधवारी रात्री ११ वाजता तेथे छापा टाकला. त्यावेळी तेथे मुलीसह डान्स व मद्यप्राशन सुरु होते. त्याठिकाणी ९ जणांना अटक करण्यात आली.

मंगेश राजेंद्र शहाणे (वय ३२, रा. संतनगर, अरण्येश्वर), ध्वनीत समीर राजपुत (वय २५), निखील सुनिल पवार (वय ३३, रा.पर्वती दर्शन), समीर उर्फ निकेश दिलीप पायगुडे (वय ३९, रा. आगळंबे फाटा, कुडे गाव, ता. हवेली), विवेकानंद विष्णु बडे (वय ४२, रा. नवी सांगवी), प्राजक्ता मुकुंद जाधव (वय २६, रा. मिलिंदनगर, सांताक्रुझ, मुंबई), निलेश उत्तमराव बोधले (वय २९, दोघेही रा. पुरंदर हाऊसिंग सासोयटी, म्हाडा कॉलनी), सुजित किरण आंबवले (वय ३४, रा. बालाजीनगर) आणि आदित्य संजय मदने (वय २४, रा. अंधेरी पुर्व, मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पळून गेलेला आरोपी संदीप चव्हाण (रा. वडगाव बुद्रुक, पुणे) आणि लबडे फार्म हाऊसचे मालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.फार्म हाऊस व्यवस्थापक समीर पायगुडे, पार्टीचे आयोजन करणारा विवेकानंद बडे आणि डान्सर मुलींना घेऊन येणारी प्राजक्ता जाधव यांना न्यायालयाने ३ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.सुटका करण्यात आलेल्या मुली या मुंबई येथील असून त्यांना फार्म हाऊस व्यवस्थापक समीर पायगुडे याने बोलावले होते. समीर पायगुडे आणि विवेकानंद बडे यांनी पार्टीचे आयोजन केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. फार्महाऊसची झडती घेतली असता या ठिकाणी बेकायदेशीर वेश्या व्यवसाय सुरू असल्याचेही आढळून आले.

बुधवार दिनांक 28 एप्रिल रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास कुडजे गावातील लबडे फार्म येथे डान्स पार्टी सुरू असल्याची गोपनीय माहिती उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांना मिळाली होती. चांदगुडे, पोलिस अधिकारी किरण देशमुख, शिवाजी दबडे, अमोल भिसे, धनंजय बिटले, महिला कर्मचारी रेश्मा वर्पे यांच्या पथकाने फार्म हाऊसवर छापा टाकून कारवाई ही केली.

Related posts

कोरोना विषाणु ची टेस्ट कीट “My Lab” ने बनवली !

Vishal Khandagale

डॉ.नीलम गोऱ्हे यांचे केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र

Vishal Khandagale

पुणे पोलिसांच्या रेकॉर्ड वरील गुन्हेगारा कडून ६ गावठी पिस्टल व १२ काडतुस सह अटक

Vishal Khandagale

Leave a Comment