पुणे शहर

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिरात होळीनिमित्त द्राक्षांची आकर्षक आरास

बुधवार पेठेतील कै. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट तर्फे होळी पौर्णिमेनिमित्त दत्त मंदिरात 100 किलो द्राक्षांची आरास केली आहे.

द्राक्षांचे घड, विविध प्रकारची पाने व फुलांचा वापर करुन ही सजावट साकारली आहे.

पंढरपूर येथील व्यावसायिक प्रकाश कुलकर्णी यांच्यातर्फे ही आरास करण्यात आली. सुभाष सरपाले यांनी सजावट केली.

होळी पौर्णिमेनिमित्त साकारलेली आरास सोमवार (दि.29) पर्यंत असणार आहे.

ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रुकारी म्हणाले : होळी पौर्णिमेनिमित्त दत्तमहाराजांना हा महानैवेद्य अर्पण करण्यात आला.

कार्निशन, ऑर्चिड, अ‍ँन्थोरियम, जिप्सो यांसह हिरव्या पानांचादेखील आराससाठी वापर केला आहे.

Related posts

पथारी व्यवसाय : हा फक्त विमाननगरचा नव्हे, तर महाराष्ट्रातील प्रत्येक मोठ्या शहराचा प्रश्न आहे

Vishal Khandagale

शिवाजीनगर येथे शिबिरात 44 जणांचे रक्तदान

Vishal Khandagale

जंम्बो रुग्णालयामधील रुग्णांसाठी “ऑक्सीकुल“ या ब्रँडने आयुहेल्थ ; आयुर्वेदिक तत्वयुक्त २५००० पाण्याच्या बाटल्या भेट

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX